परभणी : ओंकार भजनी मंडळ परभणी आपली ३२ वर्षाची अखंडीत गुरूवार पंचपदी भजन सेवा पूर्ण करून ३३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त ओंकार भजनी मंडळाचा वार्षिक उत्सव दि. ७ ते दि. ९ मार्च या कालावधीत श्री दत्त मंदिर, चिन्मय शक्तिपीठ (पानगावकर महाराज मठ) त्रिमूर्ती नगर परभणी येथे संपन्न होणार आहे.
यानिमित्त दररोज सकाळी ९ ते ११ श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण, दुपारी ११ ते १२ दत्त पंचपदी भजन व आरती, रात्री किर्तन होणार असून यात दि.७ मार्च रोजी रात्री ८ ते १० ह.भ.प. प्रणव महाराज जोशी मेहुनकर, जालना, दि. ८ मार्च ह.भ.प. शरद दत्तदास बुवा घाग, नरसोबाची वाडी, पुणे यांचे किर्तन तर दि. ९ मार्च रोजी सकाळी १० ते ११ भव्य पालखी सोहळा मिरवणूक दुपारी ११.३० ते १.३० ह.भ.प अँड सच्चिदानंद महाराज कुलकर्णी यांचे काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसाद होणार आहे.
या उत्सवास भाविकांनी पूर्ण वेळ उपस्थित रहावे. तसेच सर्वांनी गजानन विजय ग्रंथ पारायणास बसावे. पारायणासाठी पोथी (ग्रंथ) उपलब्ध करून दिला जाणार असून अधिक माहितीसाठी हभप अँड. सच्चिदानंद महाराज कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.