सांगली : प्रतिनिधी
सांगलीतील खाद्यपदार्थांच्या गोदामामध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. पेठनाका या परिसरात असलेल्या गोदामाला गुरुवारी (ता. १३ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्यातील विविध भागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता सांगलीतील खाद्यपदार्थांच्या गोदामामध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली.
पेठनाका या परिसरात असलेल्या गोदामाला गुरुवारी (ता. १३ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले असून या आगीने संपूर्ण गोदामाला आपल्या कचाट्यात घेतले होते.