छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यात हर्षकुमार क्षीरसागरचा भागीदार व सहआरोपी यशोदा शेट्टी व तिचा पती बी. के. जीवन यांनी त्यांच्या कर्नाटकमधील मूळ गावी दीड हजार स्क्वेअर फुटांची जमीन खरेदी केली होती. याचा व्यवहार घोटाळ्यातीलच रकमेतून झाल्याचे आता सांगण्यात येत आहे.
हर्षकुमार क्षीरसागर (२१)चा क्रीडा संकुलातील २१.५९ कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आहे. पोलिस यात त्याच्यासह अन्य आरोपींच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती मागवत आहे. नुकतेच पोलिसांनी जर्मनीला दुरुस्तीसाठी पाठवलेला १६ लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा जप्त केला. त्यात आता जीवनच्या नावावर परराज्यात जमीन असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्याबाबत पोलिस आता त्याचा व्यवहार व खरेदी प्रक्रियेची माहिती घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत.
जीवन कॅन्टीनचालक
हर्षकुमारसह लिपिक असलेल्या यशोदा शेट्टीचा पती असलेल्या जीवनलाच विभागीय क्रीडा संकुलाच्या कॅन्टीनचे कंत्राट देण्यात आले होते. हर्षकुमारसोबत त्यांनी साता-यात एक फ्लॅट खरेदी केला होता. शिवाय, पूर्वी घेतलेल्या पैठण रस्त्यावरील एका रो-हाऊसचे कर्जदेखील त्याने याच घोटाळ्यातील रकमेतून फेडले. पोलिसांनी ते रो-हाऊसदेखील सील केले आहे.
कॅन्टीनचालकाने परराज्यात घेतला ‘प्लॉट’
– विभागीय क्रीडा संकुल घोटाळा