20.3 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeराष्ट्रीयमध्यप्रदेशातील ३५ गावात होणार हि-याचा शोध

मध्यप्रदेशातील ३५ गावात होणार हि-याचा शोध

ग्वाल्हेर-शिवपुरी परिसरात ‘जीएसआय’च्या उपग्रह सर्व्हेक्षणात मिळाले संकेत

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील पन्ना परिसर आधीपासून हि-यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आता आणखी एक परिसर यासाठी प्रसिद्ध होणार आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-शिवपुरी परिसरात मोठी खाण सापडल्याचे बोलले जात आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणने केलेल्या सर्वेक्षणात या बाबी समोर आल्या आहेत. चंबळ प्रदेशातील संपूर्ण ४२१ किलोमीटर परिसरातील द-याखो-या आणि जंगलांमध्ये हिरे आढळू शकतात, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

सरकारी संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात असे म्हटले आहे की, पन्ना हिरे ज्या भागात आढळतात तो विंध्याचल टेकड्यांचा परिसर आहे आणि चंबळ देखील याच भागात येतो. ‘जीएसआय’ ने सांगितले की, या भागातील माती, खडक आणि हवामान पन्नासारखेच आहे, त्यामुळे येथे हिरे सापडण्याची पूर्ण शक्यता आहे. ‘जीएसआय’ने त्यांच्या सर्वेक्षणात चंबळ परिसरातील ३५ गावे डायमंड ब्लॉकसाठी ओळखली आहेत.

‘जीएसआय’ने या संपूर्ण परिसराला नरवार डायमंड ब्लॉक असे नाव दिले आहे. एकेकाळी दरोडेखोर आणि बंडखोरांच्या गोळ्यांनी ओळखल्या जाणा-या परिसराला आता हि-यांमुळे नवी ओळख मिळणार आहे.

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण आता दुसरे सर्वेक्षण करण्याची तयारी करत आहेत. शोध कार्यासाठी चिनौर आणि मोहना परिसर निवडण्यात आला आहे. महसूल आणि वन विभागाची जमीन या भागात येते. आता हि-यांच्या खाणीसाठी जागा ओळखण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. ग्वाल्हेरच्या घाटीगाव ब्लॉक आणि भितरवार ब्लॉकमधील हि-यांच्या खाणींसाठी हे सर्वेक्षण केले जाईल. जीएसआयने महसूल, वन आणि राखीव वनजमिनीची माहिती मागवली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर, हि-यांच्या खाणींसाठी खाणींचे वाटप केले जाणार आहे.

नरवार डायमंड ब्लॉक
जीएसआयला त्यांच्या उपग्रह सर्वेक्षणात ग्वाल्हेर परिसरात हिरे असल्याचे संकेत मिळाले आहेत. यासाठी चिनौर आणि मोहना परिसर निवडण्यात आला आहे. महसूल आणि वन विभागाची जमीन या भागात येते. आता हि-यांच्या खाणीसाठी जागा ओळखण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. सध्या ग्वाल्हेरमध्ये हि-यांच्या उत्खननासाठी ३५ गावे ओळखली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR