33.2 C
Latur
Wednesday, February 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुढील आठवड्यात लाडक्या बहिणींचा हप्ता देणार

पुढील आठवड्यात लाडक्या बहिणींचा हप्ता देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई : महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहिण योजनवरुन आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगतिले जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार यांना मोठं वक्तव्य केले आहे. कालच मी ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले. गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिक विमा काढण्यात आला आहे. कुठे फेडणार हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR