18 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeराष्ट्रीयभारताबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचा पर्दाफाश

भारताबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचा पर्दाफाश

नवी दिल्ली : मेटाने अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालात भारताबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. या अहवालात अशा खात्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांची संख्या सतत वाढत आहे आणि जी प्रत्यक्षात चीनमधून कार्यरत आहेत. वापरकर्त्याच्या मतावर आणि विविध मुद्द्यांवर प्रभाव टाकण्याचे काम याद्वारे केले जात होते. चालू असलेल्या चर्चेवर प्रभाव टाकण्यासाठी या खात्यांद्वारे प्रयत्न केले जात होते. या नेटवर्कने अवलंबलेल्या विशिष्ट धोरणांवर अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.

आपल्या त्रैमासिक धमकी अहवालात, मेटाने उघड केले आहे की त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला चिनमधून तयार करण्यात आलेल्या बनावट खात्यांचे मोठे नेटवर्क बंद केले आहे. भारतीय नागरिक असल्याचा आव आणणारी ही फेसबुक खाती भारतीय राजकारण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक मुद्द्यांवर चुकीची माहिती पसरवण्यात सक्रियपणे गुंतलेली होती. अहवालात म्हटले आहे की, पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तिमत्त्वांची बनावट खाती फेसबुकवर चालवत होते. प्रामुख्याने तिबेट आणि अरुणाचल प्रदेशमधील स्थानिक बातम्या, संस्कृती, क्रीडा आणि प्रवासाचे विषय प्रकाशित करत होते.

भारत सरकारवर केले आरोप
तसेच हे नेटवर्क इंग्रजी आणि काही प्रमाणात हिंदी भाषेचा वापर करत होते. फेसबुकच्या मूळ कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेश-केंद्रित खात्यांनी भारतीय सैन्य, भारतीय क्रीडापटू आणि भारतीय वैज्ञानिक कामगिरीबद्दल सकारात्मक टिप्पण्या पोस्ट केल्या आहेत, परंतु भारत सरकारवर भ्रष्टाचार आणि मणिपूर राज्यातील वांशिक हिंसाचाराचे समर्थन केल्याचा आरोपही केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR