26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार संदीप क्षीरसागर अजित पवारांच्या भेटीला

आमदार संदीप क्षीरसागर अजित पवारांच्या भेटीला

चर्चेला उधाण, बीडच्या प्रश्नांसाठी भेट घेतल्याची माहिती

जुन्नर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात चांगलेच राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. असे असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. आमदार क्षीरसागर यांनी अजित पवारांची जुन्नरमध्ये येऊन भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. मला संदीप क्षीरसागर भेटले. पण त्यांच्या बीड शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत ते मला भेटले, असे म्हटले. बीड नगरपालिकेचे वीज बील थकलेले आहे. त्यामुळे एका जिल्ह्याच्या ठिकाणी २१ दिवसांनी पाणी पुरवठा होतो, हे योग्य नाही. त्यामुळे संदीप क्षीरसागर तक्रार करत होते की यामधून काही तरी मार्ग काढा. यासाठी आमदार क्षीरसागर भेटायला आले होते. यापेक्षा दुसरे काहीही नाही. यातून दुसरा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले.

नगरपालिकेच्या प्रश्नासाठी भेटलो
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आमच्या बीडच्या नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे. त्यासंदर्भात मी अजित पवार यांची भेट घेतली. आजही आमची योजना तयार असताना वीज बील भरले नाही म्हणून कनेक्शन जोडलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही बीड शहराला १५ ते २० दिवसांनी पाणी मिळत आहे. ही अडचण मी अजित पवार यांना सांगितली. तसेच या भेटीची कोणतीही गुप्तता पाळलेली नव्हती, असे क्षीरसागर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR