20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयडॉ. कफील खानविरोधात गुन्हा

डॉ. कफील खानविरोधात गुन्हा

लखनौ : उत्तर प्रदेशातील डॉ. कफील खान पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. लखनौमध्ये कृष्णनगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डॉ. कफील खान आणि त्यांचे सहकारी सरकारविरोधात कट रचत आहेत आणि दंगली पसरवू शकतात, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच, डॉ. कफील खान यांनी आपल्या पुस्तकात सरकारविरोधी आणि भडकाऊ गोष्टी लिहिल्याचा आरोपही करण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणाचा सध्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, डॉ. कफील खान यांच्याविरुद्ध कलम १५३-बी, १४३, ४६५, ४६७, ४७१, ५०४, ५०५, २९८, २९५, २९५-ए अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. योगी सरकार पाडण्यासाठी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डॉ. कफील खान यांच्यावर आहे. गोरखपूर दुर्घटनेवरील गुप्त पुस्तक याच हेतूने गुप्तपणे पसरवले जात आहे असे दावा तक्रारदार मनीष शुक्ला यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. चार-पाच लोक डॉ. कफील खान आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या नावाने दंगल घडवण्याबाबत बोलत होते असा आरोप तक्रारदार मनीष शुक्ला यांनी केला आहे. दरम्यान, मनीष शुक्ला यांच्या तक्रारीच्या आधारे कृष्णानगर पोलिस ठाण्यात डॉ. कफील खान आणि चार-पाच अज्ञात लोकांविरुद्ध १ डिसेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता.

डॉ. खान यांना यापूर्वीही अटक
ऑगस्ट २०१७ मध्ये गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये डझनभर मुलांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी डॉ. कफील खान हे मेडिकल कॉलेजमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून तैनात होते. त्यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप होता. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. डॉ. कफील खान यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR