नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये आज पहाटे ( १७ फेब्रुवारी)मोठा भूकंप झाला. या भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी दिल्ली अक्षरश: हादरली. हा भूकंप इतका जोरदार होता की, बेडपासून अगदी घरातील खिडकीपर्यंत सर्व काही हादरले होते. अनेक वर्षांनंतर सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये इतका मोठा भूकंप जाणवला. भूकंपामुळे काही सेकंद जमीन हादरली. गाढ झोपलेले लोकही भीतीने घराबाहेर पळू लागले.
आतापर्यंत या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी ६.३० च्या सुमारास झाला. जमीन काही सेकंद थरथरत राहिली. त्यामुळे लोकंही घाबरले होते ते घाबरून पळू लागले. झोपलेल्या लोकांना ते जाणवले. घरातल्या वस्तू हलू लागल्या. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली-एनसीआर होता.
दिल्ली-एनसीआरमध्ये हा मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती. भूकंप इतका जोरदार होता की, लोकांना या भूकंपाचे धक्के तीव्रतेने जाणवले. जमिनीच्या आत काही मोठी हालचाल होत असल्याचा भास होत होता. घराच्या भिंती, खिडक्या सगळं काही हालत होतं. सध्या तरी या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.