चंदिगड : तीन वर्षांपूर्वी ५ जानेवारी २०२२ रोजी विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौ-यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आली होती. या प्रकरणात शेतक-यांना आरोपी करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात शेतक-यांवर कलम ३०७ लागू करण्यात आले होते. शेतक-यांचे म्हणणे आहे की, सभापतींनी शेतक-यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन दिले आहे. यावरून शेतक-यांनी विधानसभा अध्यक्ष कुलतार सिंग संधवान यांची भेट घेतली.
दुसरीकडे, खानौरी सीमेवरील शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांचे उपोषण ८४ व्या दिवशी दाखल झाले आहे. शेतकरी चळवळीत शहीद झालेले तरुण शेतकरी शुभकरण सिंग यांची पुण्यतिथी २१ फेब्रुवारी रोजी पाळण्याचा निर्णय शेतक-यांनी घेतला आहे, त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारसोबत सहाव्या फेरीच्या चर्चेचा कार्यक्रम होणार आहे. या दरम्यान, शुभकरण यांच्या बल्लोह भटिंडा या गावात एक बैठक आयोजित केली जाईल.
याशिवाय, त्या दिवशी शंभू-खनौरी आणि रतनपूर सीमेवरही बैठका होतील. यामध्ये सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. याच वेळी, शेतक-यांनी एक बैठक घेतली आहे आणि भटिंडा येथे होणा-या कार्यक्रमाबाबत रणनीती बनवली आहे. पदयात्रा १९ फेब्रुवारी रोजी हरियाणातील सिरसा येथून सुरू होईल आणि २१ फेब्रुवारी रोजी भटिंडा येथे संपेल.