31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयचांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतले

चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतले

प्रयोगानंतर इस्रोचे हे आणखी एक यश इस्रोने दिली माहिती

बंगळूरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चांद्रयान-३ महत्त्वाची अपडेट दिली आहे. चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आल्याची माहिती देत भविष्यात ते कसे फायदेशीर ठरेल हे इस्रोने सांगितले आहे. चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल आपले मिशन यशस्वीरित्या पूर्ण करून पृथ्वीच्या कक्षेत परतले आहे. चंद्रावरील विक्रम लँडर एका पृष्ठभागावरून दुस-या पृष्ठभागावर नेण्याच्या प्रयोगानंतर इस्रोचे हे आणखी एक यश आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सांगितले की, चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणले गेले. हे अंतराळयान १४ जुलै २०२३ रोजी एसडीएससी, एसएचएआरवरून एलव्हीएम३-एम४ वाहनावर सोडण्यात आले होते. २३ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीरित्या उतरला. इस्रोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एजन्सीचे मुख्य लक्ष्य लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करणे आणि चंद्राच्या अंतिम कक्षेत ठेवणे हे होते. विभक्त झाल्यानंतर, प्रोपल्शन मॉड्यूलचे स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (शेप) पेलोड सक्रिय केले गेले. योजनेनुसार, आधी हा पेलोड प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये तीन महिन्यांसाठी सक्रिय ठेवण्याची योजना होती. सध्या प्रोपल्शन मॉडयूल पृथ्वीभोवती फिरत आहे.

कक्षेत राहण्याचा कालावधी १३ दिवसांचा
२ नोव्हेंबर रोजी त्याने १.५४ लाख किमी अंतरावर पहिले पेरीजी पार केले. इस्रोने सांगितले की, या कक्षेत राहण्याचा कालावधी १३ दिवसांचा आहे. इस्रो याचे फायदे सांगताना म्हटले आहे की, प्रोपल्शन मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून परत आणण्याच्या प्रयोगाचा मुख्य फायदा आगामी मोहिमांचे नियोजन करताना होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR