22.1 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमनोरंजन ‘सिकंदर’चे फर्स्ट पोस्टर लाँच

 ‘सिकंदर’चे फर्स्ट पोस्टर लाँच

 सिनेमा ‘ईद’ला रिलीज होणार सलमानसोबत रश्मिकाही झळकणार

मुंबई : वृत्तसंस्था
 एकीकडे ‘छावा’ सिनेमाची धूम सुरू असतानाचा  बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘सिकंदर’ हा नवा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ‘सिकंदर’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर, आज चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सिनेमाच्े नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे.
दरम्यान, बॉलिवूड विश्वात सध्या विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची चलती आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित हा सिनेमा असून संभाजीराजांच्या शौर्य आणि बलिदानाचा इतिहास पहिल्यांदाच ७० मिमी पडद्यावर मांडण्यात आला आहे. प्रेक्षकांचाही या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून चित्रपटातील काही सीन अंगावर शहारे आणणारे आहेत.
सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिकंदर’ सिनेमाचे पहिले पोस्टर २६ डिसेंबर २०२४ रोजी लाँच करण्यात आले होते. त्यानंतर, सिकंदरचा टीझरही प्रदर्शित झाला होता. आता, या सिनेमाचे आणखी एक पोस्टर लाँच करण्यात आले असून पोस्टरमधील सलमानचे डोळेच सारे काही बोलून जात आहेत. यंदाच्या रमजान ईदला ‘सिकंदर’ हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे सलमानने हे पोस्टर शेअर करताना म्हटले आहे. साजिद नाडियादवालाने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमातही रश्मिका मंदाना झळकणार आहे. कारण, आपल्या ट्विटमध्ये त्याने रश्मिकाला देखील टॅग केले आहे. १४  सेकंदाच्या व्हीडीओतून हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
  सिनेमात सलमानसोबत रश्मिका मंदाना आणि काजल अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मार्च म्हणजेच पुढील महिन्यात ईदच्या मुहूर्तावर ‘सिकंदर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी चित्रपटगृहात धडक देणार आहे.  दरम्यान, ‘पुष्पा’ सिनेमानंतर अनेकांची क्रश बनलेल्या रश्मिका मंदानाची ‘छावा’ सिनेमाच्या माध्यमातून हिंदीत एन्ट्री झाली आहे. तर, पहिल्यांदाच सलमान खानसोबत ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR