पुणे : प्रतिनिधी
किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि आनंदात आज ३९५ वा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर अनेक नेत्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा दणक्यात संपन्न झाला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९५ वी जयंती साजरी केली जात असून शिवनेरी किल्ल्यावर या दिमाखदार सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जयंती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यादरम्यान, मान्यवरांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा देखील करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजवला. यावेळी शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात शिवरायांच्या नावाचा गजर करण्यात आला. या देदीप्यमान सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.
सोहळ्यादरम्यान, मान्यवरांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा देखील करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजवला. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मर्दानी खेळांचे आयोजनही करण्यात आले होते.