30.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeसोलापूरभारती विद्यापीठामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ या विषयावर व्याख्यान

भारती विद्यापीठामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ या विषयावर व्याख्यान

सोलापूर: भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला प्रमुख वक्ते म्हणून सी. ए सचिन भट्टड लाभले.

व्याख्यानाच सुरुवातीला इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व भारती विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री संदीप झवेरी यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

प्रमुख वक्ते म्हणून सी. ए . सचिन भट्टड आपल्या भाषणामध्ये नवीन कर रचनेनुसार १२ लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न आता प्राप्तिकर मुक्त असल्याचे सांगितले. मध्यमवर्गीना हातात येणारी अतिरिक्त रक्कम त्यांना उपभोगासाठी किंवा बचत बचतीच्या स्वरूपात ही वापरता येईल. या अर्थसंकल्पामध्ये कमी पीक उत्पादकता असलेल्या १०० जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना चालू केल्याचे तसेच किसान कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा पाच लाखापर्यंत वाढविण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

एम. एस. एम. इ क्षेत्रासाठी गुंतवणूक व उलाढाल मर्यादा अनुक्रमे अडीच व दोन पट वाढविण्यात आली असून यामुळे मेक इन इंडिया च्या पुढील टप्प्यात लघु , मध्यम व मोठ्या उद्योजकांचा समावेश होईल. शहरांमध्ये स्मार्ट इंडिया आणि स्मार्ट सिटी प्रकल्पातून पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यशाळेचे आभार प्रदर्शन डॉ. राहुल मांजरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख एम.बी.ए भाग ०१ च्या कु.अनिशा दवेकर यांनी करून दिली तर सूत्रसंचालन सूत्रसंचालन एम.बी.ए भाग ०१ च्या कु.साक्षी बरबडे यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. राहुल मांजरे व डॉ. शिवगंगा मैंदर्गी यांनी काम पाहिले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पी.पी. कोठारी , एमबीए विभाग प्रमुख प्रा. सी.आर. सूर्यवंशी , लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. अभिजीत भोंग तसेच अभिजीत कदम इन्स्टिट्यूट व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR