26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रकोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग

कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग

पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख प्रकाश आंबेडकरांचा आरोप

पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी पत्र लिहिले होते. या घटनेत अनेक उजव्या संघटनांचा सहभाग असल्याचा उल्लेख पवारांनी केला होता असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भीमा कोरेगाव आयोगाच्या सुनावणी दरम्यान आंबेडकर यांनी ही माहिती आयोगाला दिली असल्याचे पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा सुनावणीच्या मागच्या तारखेला लेखी स्वरूपात सगळे देण्यात आले होते. त्यावेळी एक मुद्दा आम्ही मांडला होता की, पोलिस आयुक्त पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस अधिक्षकांचे वर्जन वेगळे आहेत. ग्रामीण पोलिस भिडे आणि एकबोटे याच्यावर इशारा करत होते. तर पुणे पोलिस नक्षलवादी यांच्याकडे बोट करत आहेत. तर तिसरा अँगल शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बाबतीत एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात पवारांनी राईट विंग वरती आरोप केले होते.

कमिशन समोर त्याबाबतही कुठलीच कागदपत्रे नव्हती. त्या संदर्भातील सगळी कागदपत्रे मी सादर केले आहेत. हे पत्र पवारांनी ठाकरेंना लिहिल होत. आयोगाने पत्र स्वीकारले आहे पुन्हा सुनावणी आयोगासमोर होणार आहे. पुढील सुनावणीत पवारांची साक्ष घेणे गरजचे आहे का? हे तपासणार आहेत. गरज पडली तर पवारांना बोलणार असे आयोगाने सांगितलं असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले. आयोग तिन्ही अँगल तपासणार आहेत. पत्रात अनेक उजव्या संघटनेची नावे असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे.

देशमुख कुटुंबाचा एफआयआर महत्वाचा
देशमुख कुटुंब मला भेटायला आलं होत. तेव्हा मी विचारल होत की तुम्ही ऋकफ दाखल केला आहे का? तर त्यांनी तो नव्हता केला. मग नंतर त्यांनी एफआयआर दाखल केला. एफआयआर मधली संशयित आरोपींची नावे पुढे आल्याशिवाय घेता येत नाहीत. कुटुंबाचा एफआयआर महत्वाचा आहे. जरांगे यांना कंट्रोल करण्यासाठी धस यांना पुढे करण्यात आले आणि आता भाजपने धस यांनाच संपवल. आरोप सिद्ध झाले तर मुंडेंनी राजीनामा दिला तर योग्य दमानिया यांनी कोर्टात पुरावे सादर करावे. राहुल सोलापूरकर यांच्याबाबत बोलताना त्यांनी अशी बांडगुळ खूप आहेत अशा बांडगुळांवर बोलण्याची गरज नाही असे सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR