लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय परीक्षा मंडळाच्यावतीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा शुक्रवार दि. २१ फेबु्रवारी पासून सुरू झाली आहे. लातूर जिल्हयातील १५२ परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा पेपर शुक्रवारी पार पडला. या परीक्षेला नियमित ३७ हजार ६७४ पैकी ३६ हजार ९९५ विद्यार्थी उपस्थित होते. तर ६७३ विद्यार्थ्यांनी पहिल्याच पेपरला दांडी मारली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय परीक्षा मंडळाच्यावतीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा शुक्रवार पासून सुरू झाली आहे. सदर परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीमध्ये पार पडणार आहे. लातूर विभागीय परीक्षा मंडळामध्ये लातूर जिल्हयातील १ हजार ८४८ शाळेतील ३७ हजार ६७४ विद्यार्थी १५२ परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरूळीत पार पडावी म्हणून २० परिरक्षक, १५२ रनर, ७ भरारी पथके, ४ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व यंत्रणा आपली कामे पार पडत असून लातूर जिल्हयातील १५२ परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा पेपर शुक्रवारी पार पडला. या परीक्षेला ३७ हजार ६७४ पैकी ३६ हजार ९९५ विद्यार्थी उपस्थित होते. तर ६७३ विद्यार्थ्यांनी पहिल्याच पेपरला दांडी मारली.