26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रभिवंडीत तरुणीवर सामूहिक अत्याचार

भिवंडीत तरुणीवर सामूहिक अत्याचार

भिवंडी : प्रतिनिधी
भिवंडीत एका महिलेवर सहा जणांकडून सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ वर्षीय पीडित महिलेवर सहा नराधमांकडून पिकअप व्हॅनमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे भिवंडी शहर हादरून गेले आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित महिला भिवंडी शहरातील फातिमानगर भागात रहात असलेल्या मावशीच्या घरी २० फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास झोपली होती. त्यानंतर झोपेतून जाग आल्यानंतर तिने मध्यरात्रीनंतर मोबाईल तपासला असता तिच्या भावाचे १५ मिस्ड कॉल दिसले. त्यानंतर लगेच तिने मोबाईलवर कॉल केला असता भावाची तब्येत ठीक नसल्याचे पीडितेला समजले.

त्यानंतर २१ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास तातडीने रिक्षा पकडून ती भाऊ वाट बघत असलेल्या ठिकाणी गेली असता नराधमांनी तिच्या भावासह रिक्षाचालकाला मारहाण करून पिटाळून लावत तिला नागाव भागातील एका शाळेच्या मागील झाडीझुडपात नेऊन तिच्यावर सहा नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला एकटीला घेऊन नराधम फातिमानगर येथे आले. या ठिकाणी उभ्या असलेल्या पिकअप व्हॅनमध्येही सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे पीडित महिला भयभीत झाली.

दरम्यान, पीडितेने नराधमाच्या तावडीतून आपली सुटका करत भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तिच्यावर घडलेला धक्कादायक प्रसंग सांगताच पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत तो गुन्हा झिरो नंबरने पुढील तपासासाठी शांतीनगर पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे.

याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात सहा नराधमांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (ड), (बलात्कार), ७० (१) (सामूहिक बलात्कार), ११५ (२) (स्वेच्छेने दुखापत करणे) ३ (५) (अनेक व्यक्तींनी सामान्य हेतूने केलेले गुन्हेगारी कृत्य) यानुसार पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद सईद आलम, पाशा, लड्डू, गोलू आणि इतर दोन अनोळखी अशी नराधमांची नावे असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR