वसई : सध्याचे दुचाकीचालक रस्ता मोकळा दिसला नाही की आपल्या दुचाकीला इतक्या वेगाने पळवतात की, त्यांची स्पर्धा ही वा-याशीच आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. पण यामुळे अनेकदा भीषण दुर्घटना घडतात आणि चालकांना आपला जीव गमवावा लागतो. असाच काहीसा प्रकार वसई पूर्वेतील मधुबन परिसरात घडला आहे.
दोन भरधाव वेगात असलेल्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी (ता. २२ फेब्रुवारी) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातात ज्या तिघांचा मृत्यू झाला आहे, ते नेमके कोण? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु, या अपघाताची भीषणता पाहता परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.