19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeधाराशिवहिसोरी येथील मुलीचा जागजी येथे अपघाती मृत्यू

हिसोरी येथील मुलीचा जागजी येथे अपघाती मृत्यू

धाराशिव : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील हिसोरी येथील ७ वर्षीय मुलीचा दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला. हा अपघात जागजी ता. धाराशिव येथे झाला. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाणे येथे ४ डिसेंबर रोजी ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिसोरी ता. लातूर येथील राहुल कचरु सोनवणे, राखी राहुल सोनवणे व त्यांची ७ वर्षाची मुलगी रोहीणी राहुल सोनवणे हे तीघे दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी जागजी गावाचे जवळ आली असता ट्रॅक्टर क्र एमएच २५ एएस ०८५८ च्या चालकाने दुचाकीला धडक दिली. ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरला उसाच्या लोढची विनानंबर ट्रॉली जोडली होती. त्या ट्रॉलीला पाठीमागील बाजूस प्रकाश परावर्र्तीत करणारे रिप्लेक्टर अथवा रेडीयम न लावता ट्रॅक्टर ट्रॉलीसह रोडवर उभे केले होते. दरम्यान, राहुल सोनवणे यांची दुचाकी ट्रॉलीला पाठीमागून धडकली व अपघात झाला. या अपघातात रोहीणी राहुल सोनवणे ही गंभीर जखमी होवून त्यामध्ये तीचा मृत्यू झाला. राहुल सोनवणे, राखी सोनवणे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी मयताचा भाऊ रोहीत कचरु सोनवणे यांनी दि. ४ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २८३, ३३७, ३३८, ३०४ (अ) सह १३४ (अ) (ब), १८७, १०४, ७७ मोवाका अन्वये ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR