24.4 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रकिसान सन्मान निधीत लवकरच तीन हजारांची वाढ

किसान सन्मान निधीत लवकरच तीन हजारांची वाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपूर : राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतक-यांना नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे वितरण झाले. वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, आ. कृष्णा खोपडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, वनामतीचे प्रभारी संचालक रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणीस म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र शासन वर्षाला शेतक-यांच्या बँक खात्यात थेट ६ हजार रुपये वितरित करते. तर राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतक-यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता राज्य शासन या निधीत ३ हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे ९ हजार आणि केंद्र शासनाचे ६ हजार असे शेतक-यांना आता वर्षाला १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तसेच प्रगतीशील शेतक-यांना गौरविण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR