हिंगोली : देशाचे माजी कृषी मंत्री आणि खासदार शरदचंद्र पवार हे मंगळवार दि. २५ फेब्रुवारीला हिंगोली दौ-यावर येणार असून नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.
२५ फेब्रुवारी रोजी माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार हे नांदेड येथून सकाळी ११ ते ११.३० दरम्यान नर्सी नामदेव येथे येणार आहेत. या ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन विश्वस्तासह चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान हिंगोली शहरातील हॉटेल शांतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक माणिकराव (देशमुख) टाकळगव्हाणकर यांचा शताब्दी गौरव सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. या दौ-यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे.