21.7 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeक्रीडान्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

बांगलादेशचा ५ गड्यांनी पराभव

दुबई : न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सहाव्या सामन्यात बांगलादेशवर ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने न्यूझीलंडला विजयासाठी २३७ धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडने हे आव्हान ४६.१ ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून पूर्ण केले.

रचीन रवींद्र हा न्यूझीलंडच्या विजयाचा नायक ठरला. रचीन रवींद्र याने शतकी खेळी केली. तर टॉम लॅथम याने अर्धशतकी खेळी केली. यासह न्यूझीलंड आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर बांगलादेश आणि पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आले आहे.

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, मेहदी हसन मिराज, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, जाकर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, नाहिद राणा आणि मुस्तफिजुर रहमान.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​डेव्हॉन कॉनव्हे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लाथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरोर्क.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR