29.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रगणपत गायकवाडांच्या मुलाला क्लीन चिट

गणपत गायकवाडांच्या मुलाला क्लीन चिट

महेश गायकवाड गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण

पुणे : प्रतिनिधी
हिललाईन पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. तत्कालीन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांनी हा गोळीबार पोलिस ठाण्यात केला होता.

६ राऊंड फायर करत त्यांनी महेश गायकवाड यांना जखमी केले होते. या प्रकरणात गणपत गायकवाड अजूनही तुरुंगात आहेत. पण या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे.
गणपत गायकवाड यांचा ज्येष्ठ पुत्र वैभव गायकवाड याला क्लीन चिट देण्यात आली आहे. उल्हासनगर कोर्टात पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ज्यात फक्त २ आरोपींचा समावेश आहे. नागेशर बडेराव आणि कुणाल पाटील.

चार्जशीटमध्ये नमूद केल्यानुसार, वैभव गायकवाड याच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत. त्याचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही, असे चार्जशीटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अद्याप वैभव गायकवाड फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

२५ हजारांजे बक्षीस देण्याची घोषणा
मागच्या महिन्यात महेश गायकवाड यांनी मोठी घोषणा केली होती. या घोषणेची चर्चा सर्वत्र झाली होती. ‘वैभव गायकवाड यांना पकडून देणा-या व्यक्तीला २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल’, अशी घोषणा महेश गायकवाड यांनी केली होती. गुन्ह्यातील आरोपी आमदाराच्या निवासस्थानी जात असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला होता.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR