26.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeसोलापूरबोगस बांधकाम परवान्याच्या आधारे बांधल्या बहुमजली ईमारती

बोगस बांधकाम परवान्याच्या आधारे बांधल्या बहुमजली ईमारती

बोगस बांधकाम परवाना प्रकरणांची कागदपत्रे सादर करण्यास १५ जणांची टाळाटाळ

सोलापूर : महापालीकेतील बोगस बांधकाम परवाना प्रकरणी नवनवीन घडामोडी समोर येत असून ९६जणांपैकी१५जण कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांनी एकूण ९६ बेकायदेशीर बांधकाम परवाने दिल्याचे आयुक्त कार्यालयाचे म्हणणे आहे. या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये ८१ जणांनी बांधकाम परवान्यांची कागदपत्रे मनपाकडे सादर केली. उर्वरित १५ जण अद्यापही कागदपत्रे द्यायला तयार नाहीत. विशेष म्हणजे ही १५ प्रकरणे बहुमजली इमारतींची असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणात महापालिकेचे दोन अधिकारी आणि चार परवानाधारक इंजिनिअर अशा एकूण सहाजणांना अटक झाली. महापालिकेचे बांधकाम परवाना विभागप्रमुख निलकंठ मठपती यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे.

बेकायदेशीर परवाने घेणाऱ्या काही मंडळींनी एफएसआय संदर्भातील नियमांचे उल्लंघन केले. एकूण १५ जणांनी बहुमजली इमारती उभा केल्या. या इमारती न्यू पाच्छा पेठ, बेगम पेठेसह शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगतात. आयुक्त कार्यालयाच्या आवाहनाला या इमारत मालकांनी ठेंगा दाखवल्याची चर्चा आहे.

बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणे जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत घडली. चार अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना एकूण ९६ बांधकाम परवाने दिल्याचे मठपती यांचे म्हणणे आहे. ज्यांनी हे परवाने घेतले त्यांच्याकडून मूळ अर्ज, सोबत जोडलेली कागदपत्रे आणि पालिकेतून दिलेले परवाना अशी सर्व कागदपत्रे मागवण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या मुदतीत एकूण ८१ जणांनी कागदपत्रे दिली यांपैकी ३६ प्रकरणे नियमित होऊ शकतात, असे बांधकाम परवाना विभागाचे म्हणणे आहे.

पोलिसांनी सादिक शेख, खुद्दुस बागवान, नावीद शेख, मोहसीन शेख यांना अटक केली आहे. उर्वरित सहा परवानाधारक अभियंत्यांना पोलिसांनी अटक केलेली नाही. मनपा अधिकाऱ्यांनी परवानाधारक अभियंता सुनील दूधगुंडी यांचेही नाव पोलिसांना कळवले होते. परंतु, दूधगुंडी यांचा या प्रकरणात संबंध नाही. त्यांना नोटीस बजावली होती. त्यांचा कामाचा परवाना नियमित झाल्याचे बांधकाम विभागप्रमुख निलकंठ मठपती यांनी स्पष्ट केले.बोगस बांधकाम परवाने प्रकरणात कोणा कोणाचे हात ‘ओले’झाले आहेत हे ही पोलीसांच्या सखोल तपासाअंती समोर येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR