26.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रराजकीय हेतूसाठी देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका;  मनोज जरांगेंचा हल्लाबोल

राजकीय हेतूसाठी देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका;  मनोज जरांगेंचा हल्लाबोल

बीड : सरकार गोड बोलून संतोष देशमुख हत्या प्रकरण हाताळत असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. या विषयात राजकारण आणू नका. कुटुंबाला अन्नत्याग आंदोलनाला बसायची वेळ येते हे वाईट असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांवरती ही दुर्दैवी वेळ यायलाच नको होती. प्रत्येकाला राजकीय हित दिसत आहे, त्यामुळं राजकीय हेतूसाठी दुस-यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका. मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुस-यांदा बळी घ्यायला लागल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनस्थळी आज मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. सरकार असताना उपोषणाची वेळ येते हे दुर्दैवी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. प्रत्येकाला राजकीय हित दिसत आहे, त्यामुळं राजकीय हेतूसाठी दुस-यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले,मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुस-यांदा बळी घ्यायला लागले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली.

मुख्यमंत्री छक्के पंजे करत आहेत
सुरेश धस यांच्यावर देखील प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले, मात्र, त्यावर बोलण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला. आपल्याला जेवढी धमक आहे, ते छातीठोकपणे काम करतो. आपल्याला छक्के पंजे खेळता येत नाहीत. दुस-याचं कुटुंब दावावर लागतात. मुख्यमंत्री छक्के पंजे करत आहेत असेही मनोज जरांगे म्हणाले.

या विषयात राजकारण आणू नका
तीन महिन्यात ज्यांची ज्यांची नावे सांगितली, त्या संदर्भात काय कारवाई केली असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. पुराव्यासह सांगूनही कारवाई झाली नाही. भ्रष्टाचार कोणी केला कोणी उकरुन काढलं. तरी काही नाही, एवढ्या दिवस तुम्ही नेमकं केलं काय? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री हे सगळं करत आहेत. या विषयात राजकारण आणू नका.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR