24.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeउद्योग‘एआय’ रोबो खवळला; भरसभेत केली हाणामारी

‘एआय’ रोबो खवळला; भरसभेत केली हाणामारी

बिजींग : वृत्तसंस्था
सध्या संपूर्ण जगभरात आर्टिफीशियल इंटेलिजन्सची जबरदस्त चर्चा सुरू आहे. हे तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत आहे. मात्र, याचा जसा फायदा, तसेच यामुळे होणारे नुकसानही कमी नाही. अगदी अलिकडचेच उदाहरण द्यायचे तर ‘डीफफेक’सारख्या घटनांचे देता येईल. सध्या जगभरात एआयचा वापर केला जात आहे. अनेक देशांमध्ये ूमनॉइड रोबोटही वापरली जात आहेत. हे रोबोट मानवाप्रमाणे काम करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. मात्र, यातच चीनमधून अशाच एका रोबोटचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

चीनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने नियंत्रित होणा-या रोबोटने माणसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सॉफ्टवेअरमध्ये काही गडबड झाल्याने हा रोबोट अनियंत्रित झाला आणि लोकांना मारण्यासाठी धावला. यानंतर काही लोकांनी त्या रोबोटला पकडले. ही घटना चीनमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान घडली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक ूमनॉइड रोबोट लोकांवर धावून जाताना दिसत आहे. तो गर्दित शिरून लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला सिक्युरिटी गार्डने पकडून कंट्रोल केले आणि मागे खेचले. या काळ्या रंगाच्या रोबोटला कपडेही घातलेले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR