26.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रगो-हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले

गो-हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले

एकनाथ शिंदेंकडून नीलम गो-हेंचे समर्थन

मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण डॉ. नीलम गो-हे यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनातील व्यासपीठावरून एक वाक्य बोलल्या ते काहीजणांना प्रचंड झोंबले. गो-हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली.

दरम्यान, अंधेरी येथे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या आभार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डॉ. नीलम गो-हे त्यांच्याबाबत आताच बोलल्यात असे नाही, यापूर्वी अनेक लोक बोलले आहेत. राज ठाकरे बोलले त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत.

मात्र लाडकी बहीण डॉ. नीलम गो-हे बोलल्या. त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे तुम्हाला शोभत नाही. त्या खरे बोलल्या. आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे. नीलम गो-हे जे बोलल्या ते कटू सत्य आहे. महिलांवर अत्याचार झाल्यास पहिल्या धावून जाणा-या नीलम गो-हे होत्या. शक्ती विधेयकामध्ये नीलम गो-हेंचे योगदान मोठे आहे. जे चांगलं काम करतात त्यांना बदनाम कसं करायची ही पोटदुखी आहे. तुम्ही डॉक्टरकडून नाही तर कंपाऊंडरकडून औषध घेत असल्याने पोटदुखी बरी होत नाही, अशी टीकाही शिंदे यांनी केली.

अडीच वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला तेव्हा रोज आम्हाला शिव्याशाप देण्याचे काम त्यांनी केले पण आम्ही त्यांना कामातून उत्तर दिले. जेव्हा त्यांची खुर्ची गेली तेव्हापासून यांना मिर्ची लागली, असा टोला शिंदे यांनी यावेळी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR