26.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeविमान लँड होत असताना रनवेवर आले दुसरे विमान!

विमान लँड होत असताना रनवेवर आले दुसरे विमान!

पायलटच्या प्रसंगावधानाने वाचले शेकडो प्रवाशी

 

शिकागो : वृत्तसंस्था
अमेरिकेतील शिकागोमध्ये एक मोठा विमान अपघात घडला असता. पायलटच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला. शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचे लँडिंग सुरू होते, तेवढ्यात अचानक दुसरे विमान आले. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. पण, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. या दोन्ही विमानात मिळून शेकडो प्रवासी प्रवास करत होते. पायलटच्या एका निर्णयामुळे या सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.

शिकागो विमानतळावर पायलटला धावपट्टीवर एक जेट विमान दिसले. हे विमान दिसताच पायलटने वेळ वाया न घालवता विमान पुन्हा एकदा आकाशात उडवले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला. जेव्हा विमान पुन्हा हवेत झेपावले तेव्हा प्रवाशांनाही आश्चर्य वाटले. काही काळ विमानातील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

काही दिवसापूर्वीच अमेरिकेत दोन विमान अपघात झाले होते. यामध्ये ६ फेब्रुवारी रोजी अलास्कामध्ये झालेल्या एका प्रवासी विमानाच्या अपघाताचा समावेश आहे. यामध्ये सर्व १० जणांचा मृत्यू झाला होता. २६ जानेवारी रोजी वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रीगन राष्ट्रीय विमानतळावर आर्मी हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाची टक्कर झाली, यामध्ये दोन्ही विमानांमधील ६७ जणांचा मृत्यू झाला.

बुधवारी, सकाळी ९ वाजता साऊथवेस्टचे विमान अचानक थांबले. त्याचवेळी धावपट्टीवर एक जेट विमान रनवे पार करत होते. याबाबत आता विमान कंपनीकडून निवेदन आले आहे. साउथवेस्ट फ्लाइट २५०४ सुरक्षितपणे उतरले आहे, असे यात सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR