29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeसोलापूरपोल्ट्रीच्या घाणीने शेती प्रदूषित होत असल्याचा आरोप

पोल्ट्रीच्या घाणीने शेती प्रदूषित होत असल्याचा आरोप

सोलापूर : पोल्ट्री फार्ममधील घाणीमुळे शेतीचे नुकसान होत आहे, असे म्हणत दक्षिण सोलापुरातील मुस्ती गावांमधील शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. निवेदन देताना कार्यालयात पोल्ट्री फार्ममधील शेतात पडलेली घाण अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली. त्यावेळी अधिकार्‍यांसोबत आंदोलन करताना ही घाण वास येत असल्याने नाकाला रुमाल लावले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन मिनिटे हा वास सहन होत नाही, आम्ही दोन वर्षापासून वास सहन करत आहोत. पोल्ट्री फार्ममधील कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नाही. ती शेजारी असलेल्या आमच्या शेतामध्ये टाकली जाते. यामुळे आमच्या सेतीचे नुकसान होत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तिथून येणारे सांडपाणी अमीन नापीक करत आहे. यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे म्हणत युवा भीमसेना संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतक-यांनी आपले म्हणणे प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर मांडले.

मुस्ती गावामधील भामला तांडा येथील शेतकरी आपले म्हणणे मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात आले. गावात असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होतेअसे म्हणत त्यांनी व्यथा मांडली.आंदोलकांनी पिशवीतून शेतात पडलेला पोल्ट्री फार्ममधील कचरा बाहेर काढला. यामुळे संपूर्ण कार्यालयात घाण वास पसरला, कचरा बाहेर घेऊन गेल्यानंतरही अर्धा तास तरी वास गेला नाही त्यामुळे सगळे वैतागले होते.यावेळी युवा भीमसेनेचे अध्यक्ष महेश डोलारे, वामन जाधव, के.सी. पवार, एस.एम. कराडे, नामदेव राठोड, संतोष चव्हाण, सुरेश राठोड, राणूबाई जाधव, कविता पवार, राजकुमार जाधव, शंकर चव्हाण, चंद राठोड, सुभाष राठोड, दिलीप राठोड आदी उपस्थित होते.

पावसाचे व पोल्ट्री फार्ममधील पाणी शेतात न सोडता त्याची इतर ठिकाणी विल्हेवाट करावी, पोल्ट्री फार्मच्या जागेभोवती कम्पाउंड करावे, तेजारी परिसरात फिरणारया भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाग रोखण्यामाती कारवाई करावी, प्रदूषणामुळे शेतकयांना होत असलेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, मृत कोंबडया दहन करण्याची जागा इतर ठिकाणी करावी यासंबंधीचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्तीतील शेती प्रदुषणामुळे उदध्वस्त होत असल्याने महिलाही संतापल्या होत्या, आंदोलनात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला. आंदोलनकर्त्यांचे निवेदन आम्ही घेतले आहे. आम्ही त्यांचे म्हणणे देखील ऐकून घेतले आहे. आमच्या पातळीवर जी काही कारवाई करता येईल, ती आम्ही नक्की करू असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी निखिल मोरे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR