26.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeराष्ट्रीयपत्नीचा जीव वाचवण्यासाठी रोज ३० कि.मी. चा प्रवास

पत्नीचा जीव वाचवण्यासाठी रोज ३० कि.मी. चा प्रवास

प्रतिदिन ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी धडपड

भागलपूर : प्रेमासाठी काही लोक वाट्टेल ते करतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. आपल्या आजारी पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पती दररोज तब्बल ३० किलोमीटर दूर जात आहे. ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी तो धडपड करत आहे. विजय मंडल असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे. तिच्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी विजय हे त्यांच्या गावापासून भागलपूरपर्यंत दिवसातून तीन वेळा ३० किलोमीटर दूर जातात. जेणेकरून पत्नीचा जीव वाचवता येईल. त्यांचे प्रेम, दृढनिश्चय आणि कधीही हार न मानण्याची जिद्द यातून दिसून येत आहे. बिहारच्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. तसेच तिथे मूलभूत आरोग्यसेवा नाहीत.

विजय मंडल यांची पत्नी आजारी असून त्या अंथरूणाला खिळल्या आहेत. २०२० मध्ये विजय यांच्या पत्नी अनिता देवी यांना कोरोना झाला, त्यानंतर त्यांना फुफ्फुसांचा संसर्ग झाला. मायागंज हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की अनिता देवी यांचा जीव वाचवण्यासाठी नेहमीच ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता आहे. विजय मंडल यांनी मुलीच्या लग्नासाठी काही पैसे वाचवले होते. पण पत्नीच्या आजारपणामुळे ते सर्व पैसे संपले.

जेव्हा सर्वच आशा संपल्या आणि रुग्णालयातील खर्च देखील वाढत गेला तेव्हा त्यांनी आपल्या घराचेच रुग्णालयात रुपांतर करायचे ठरवले. पत्नीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. अनिता देवी गेल्या काही वर्षांपासून ऑक्सिजन सिलिंडरवर आहेत. पाच वर्षांपासून त्या इंटरस्टिशियल लंग्ज डिसीजशी झुंज देत आहेत, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त ऑक्सिजनशिवाय श्वास घेणे कठीण झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR