मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. यावेळी सीएम कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देणारा एक व्हॉट्सअॅप मेसेज आला आहे. या व्हॉट्सअॅप मेसेजमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअॅपवर हा धमकीचा संदेश मिळाला आहे. वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वाहतूक पोलिसांना पाकिस्तानी नंबरवरून व्हाट्सअॅपवर हा धमकीचा संदेश मिळाला. काल दुपारी मेसेज मिळाल्यानंतर पोलिस तपास विभाग सतर्क झाले आहे.
मेसेज पाठवणारी व्यक्ती भारतातील आहे की बाहेरील आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस विभाग व्हॉट्सअॅप मेसेज कुठून आला याचा तपास करत आहे. पाकिस्तानमधील कोणत्या ठिकाणाहून व्हॉट्सअॅप मेसेज आला याचा तपास सुरू आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाला पाकिस्तानमधून आलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने व्हॉट्सअॅप मेसेज धमकी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.