सातारा : अमेरिकेने भारतीय विद्यार्थिनी नीलम शिंदेच्या कुटुंबाला आपत्कालीन व्हिसा मंजूर केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर हे शक्य झाले. तिच्या वडिलांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे आपत्कालीन व्हिसासाठी अर्ज केला होता.
१४ फेब्रुवारी रोजी कॅलिफोर्नियामध्ये नीलम शिंदे (३५) यांना कारने धडक दिली. यानंतर त्या कोमात गेल्या. आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. नीलम या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ४ वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नीलम आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी कुटुंबीयांकडून परवानगी मागितली आहे. नीलमची काळजी घेण्यासाठी कुटुंबाचे तेथे असणे महत्त्वाचे आहे.
नीलमच्या वडिलांनी अमेरिकन दूतावासाकडून आपत्कालीन व्हिसा मागितला होता. दूतावासाने आज सकाळी ९ वाजता मुलाखतीसाठी बोलावले होते. वडील तानाजी शिंदे यांनी सांगितले की, त्यांना या अपघाताची माहिती १६ फेब्रुवारी रोजी मिळाली.