अलिबाग : येथे आज पहाटे चार वाजता एका बोटीला आग लागल्याची घटना समोर आली. आग अक्षी अलिबाग येथे किना-यापासून ६-७ नॉटिकल मैल अंतरावर राकेश गण यांच्या मासेमारी बोटीला आग लागली. ही घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजता घडली. बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच नौदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने बोटीतील सर्व १८ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे वाचवले. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदल वेळीच घटनास्थळी दाखल झाले. बोटीतील सर्व १८ जणांना सुखरूप वाचवले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ एएनआयने शेअर केला आहे. आगीने बोटला पूर्णपणे वेढा घातल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. बोट एका बाजूला झुकली आहे. नौदल मच्छीमारांना वाचवत असल्याचे दिसत आहे.