28.1 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeराष्ट्रीयकर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधीवर मिळणार ८.२५ टक्के व्याज

कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधीवर मिळणार ८.२५ टक्के व्याज

ईपीएफओ बोर्डाने जाहीर केला व्याजदर

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी असून ईपीएफओने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवला आहे.

गेल्या आठवड्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या गुंतवणूक व लेखा समितीने संस्थेच्या उत्पन्न आणि खर्चाचा आढावा घेतला. ज्यामध्ये बोर्डाने ठेवीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पीएफच्या व्याजदरातही कपात होण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात सेवानिवृत्ती संस्था ईपीएफओने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवला आहे.

ईपीएफओ बोर्डाच्या बैठकीत सूत्रांनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ८.२५% व्याजदर निश्चित केला आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या २८ फेब्रुवारीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

२०२२ मध्ये व्याजदरात मोठी कपात
यापूर्वी मोदी सरकारने २०२२ वर्षात व्याजदरात मोठी कपात केली होती. ७ कोटींहून अधिक सदस्यांसाठी २०२१-२२ साठी व्याजदर ८.५% वरून ८.१% करण्यात आला होता. सीएनबीसीच्या अहवालानुसार, ईपीएफओ​​ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत २०२४-२५ साठी ईपीएफओवर ८.२५% व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२०-२१ साठी ईपीएफवर ८.१% व्याज दर १९७७-७८ नंतर सर्वात कमी होता, जेव्हा ईपीएफ व्याजदर ८% होता. मार्च २०२० मध्ये, ईपीएफओ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर २०१८-१९ साठी प्रदान केलेल्या ८.६५% च्या तुलनेत २०१९-२० साठी ८.५% या ७ वर्षांच्या नीचांकावर आणला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR