लातूर : सुटीच्या दिवशीही वीज ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे याकरिता महावितरणची सर्व वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार असून वीजग्राहकांनी वीजबीले वेळेवर भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
मार्च अखेर वीजबील वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या हेतूने महावितरणच्या वतीने वीज देयक वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार केले असून शनिवार व रविवार या साप्ताहिक सुटीच्या काळातही वसुली पथके वसुलीसाठी कार्यरत राहणार आहेत. सुट्ट्यांच्या काळात वीज ग्राहकांना विजेचे बिल भरता यावे याकरिता महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर महावितरणचे मोबाईल अॅप, मोबाईल वॉलेट तसेच ऑनलाईन असणा-या विविध पर्यायांचा वापर करत वीज ग्राहकांनी आपल्या थकीत व चालू वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे तसेच उन्हाळ्याच्या काळात वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी त्वरीत वीजबील भरावे असे आवाहन महावितरणच्या लातूर परीमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.