28.1 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या तोंडी औरंगजेबाचा जप

उद्धव ठाकरेंच्या तोंडी औरंगजेबाचा जप

आशिष शेलारांची टीका

मुंबई : उद्धव ठाकरे हे सभेत दाखवण्यापूरती हातात रुद्राक्षाची माळ घेतात, त्यांच्या तोंडात कायम औरंगजेबाचा जप सुरू असतो, असा आरोप करत मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्ववादी ढोंगी, असे देखावे करीत असल्याची टीका शेलार यांनी केली आहे.

या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे मंत्री आशिष शेलार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व वादाच्या मुद्यावरून जोरदार निशाणा साधला. आयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यावधी लोकांनी तेथे दर्शन घेऊन आले असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा सिनेमाला मात्र महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यावधी लोकांनी तो पाहिला असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR