हातकणंगले : आळते-रामलिंग रस्त्यावरील ग्रिनवेल इको फ्रेडली अॅग्रो प्रॉडक्ट या पत्रावळ्या तयार करणा-या कारखान्याचा बॉयलर भडकल्याने मोठी आग लागली. आगीत संपूर्ण कारखाना भस्मसात झाला. अग्नीशामक दलाच्या सात बंबानी आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे ५० कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही दुर्घटना आज, शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.
रामलिंग रोडवरती पत्रावळ्या सह इको फ्रेंडली वस्तू बनविन्याचा कारखाना आहे. या कारखान्यात दररोज २५० कर्मचारी काम करतात. शनिवारी सकाळी ११ वा. कारखान्याचा बॉयलर भडकल्याचे कर्मचा-यांनी सांगितले. बॉयलर साठी ऊसाच्या पाचट (पाल्या) पासून तयार केलेले जळण आणि बगॅसचा वापर केला जात होता. बॉयलर भडकताच शिल्लक जळण आणि शेजारील तयार मालाला आग लागली. आग इतकी झपाट्याने पसरली कामगारा ना बाहेर पडणे मुश्किल झाले.
आगीत संपूर्ण तयार माल, कच्चा माल, मशनरीसह कारखाना भस्मसात झाला. इचलकरंजी महानगरपालिका, पंचगंगा, शरद साखर कारखाना, जयसिंगपूर नगरपालिका, घोडावत उद्योग, हातकणंगले नगरपंचायत, पेठवडगांव नगर परिषदच्या अग्नीशमक बंबानी आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.