नवी मुंबई : नवी मुंबईच नव्हे तर मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. नवी मुंबईतून अचानक लहान मुले बेपत्ता होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी अगदी कोवळ्या वयाची आहेत. मुले गायब होत असल्याने पालकही हादरून गेले आहेत. मुलांचे अपहरण होत असल्याची या पालकांची तक्रार आहे. तर अचानक होत असलेल्या या प्रकारामुळे पोलिसही हादरून गेले आहेत.
नवी मुंबई शहरातून मागील ४८ तासांत सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. मुले अचानक बेपत्ता होत असल्यामुळे पालक चिंतीत झाले आहेत. गायब झालेली ही सहाही मुले १२ ते १५ वयोगटाची आहेत. बेपत्ता मुलांचे अपहरण झाल्याची या पालकांची तक्रार आहे. या पालकांनी पोलिस ठाण्यात तशी तक्रारही दिली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे, कळंबोली आदी परिसरातील ही मुले असून याच परिसरातून ही मुले गायब झाली आहेत. ही सर्व मुले ३ आणि ४ डिसेंबर रोजी गायब झाली आहेत. या सहा मुलांपैकी एक मुलगा कोपर खैरणेमधून गायब झाला होता.