परभणी : शहरातील मानसोपचार तज्ञ डॉ. जगदिश नाईक यांनी लिहिलेल्या तुकायन तुका म्हणे : तुकोबांची आरइबीटी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि.९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवी प्रा. इंद्रजीत भालेराव असणार आहेत. या सोहळ्यात प्रसिध्द सिनेअभिनेते तथा मानसोपचार तज्ज्ञ, पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते डॉ. जगदीश नाईक यांच्या तुकायन पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नेत्ररोग तज्ञ तथा गाथा अभ्यासक डॉ. विकास बाहेकर यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. ज्ञानोबा नाईक, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. जगदिश नाईक व समस्त नाईक परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.