पुणे : पुणे येथील स्वारगेट बस स्टँडवरील बलात्कार प्रकरण ताजं असताना चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर हल्ला झाला आहे. दोन दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. पोलिस आणि दरोडेखोर आमनेसामने आल्यानंतर दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला आहे. पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक यांच्यावर दरोडेखोरांनी कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणासाठी दरोडेखोरांवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी दरोडेखोराच्या पायाला लागली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातल्या केंदूर घाटातली मध्यरात्री घडलेली ही घटना आहे.
पुण्यात सतत होणा-या धक्कादायक घटना पाहता पुणे विद्येचे माहेरघर की गुन्हेगारांचे शहर? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे येथील स्वारगेट बस स्टँडवरील बलात्कार घटनेनंतर देखली शहर हदरलं आहे.