मुंबई : प्रतिनिधी
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करनी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. करनी सेना अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांच्याकडून खांदे्श्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. इतिहासकार इंद्रजीत सांवत हे ब्राह्मण आणि राजपूत यांच्या विरोधात यु-ट्यूब चॅनलमध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप सेंगर यांनी केला आहे.
दरम्यान, छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा इतिहासात डोकावून पाहत चिकित्सा होऊ लागली. छावा सिनेमानंतर काही वादही समोर येऊ लागले, सिनेमातील गणोजी, कान्होजी या पात्रामुळे शिर्के कुटुंबीय संतापले तर दुसरीकडे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यासह अनेक इतिहास संशोधकांनी चित्रपटावर आपली भूमिका मांडली.
काही दिवसांपूर्वी इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला होता. धमकी देणा-या व्यक्तीचे नाव प्रशांत कोरटकर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर पोलिसात तक्रार देखील दिली होती. एकीकडे हा वाद सुरु असतानाच आता करनी सेनेने इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा करण्याची मागणी केली आहे.
वारंवार ब्राम्हण आणि राजपूत समाजाविरोधात इंद्रजीत सावंत यांच्याकडून स्टेटमेंन्ट करण्यात येते.
विदेशी लेखकांचा इतिहास वाचून इंद्रजीत सावंत बोलत असल्याचा आरोपही करनी सेनेच्या सेंगर यांनी केला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर समाजात दुही माजवली जात असल्याने त्यांच्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी करनी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे, एकीकडे इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यात वाद सुरू असतानाच सावंत यांच्याविरुद्ध करनी सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.