27.7 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेचा कृषी उत्पादनावर टेरिफचा निर्णय

अमेरिकेचा कृषी उत्पादनावर टेरिफचा निर्णय

भारतासह जगभराला बसणार फटका अमेरिकेचे शेतक-यांचा महान असे उल्लेख

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत. त्यात ट्रम्प यांच्या ३ निर्णयाचा फटका भारतालाही बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका अमेरिकेच्या लोकांसाठी फायद्याची असली तरी त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम जाणवत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे कुठले ३ निर्णय ज्याचा थेट भारतीयांवर परिणाम होतोय त्यातील एक म्हणजे कृषी उत्पादनावर लावलेले टॅरिफचा निर्णय ट्रम्प यांनी त्यांच्या देशातील शेतक-यांना संबोधित करताना ते अमेरिकेचे महान शेतकरी आहेत असा उल्लेख केला.

देशातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादने बनवणे सुरू केले पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याशिवाय पुढील महिन्याच्या २ एप्रिलपासून अमेरिकेत येणा-या कृषी उत्पादनावर टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली. कृषी क्षेत्रात अमेरिकेला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. ट्रम्प यांनी बाहेरून येणा-या कृषी उत्पादनावर टॅरिफ वाढवल्याने या वस्तू अमेरिकेत महाग होतील. ज्यातून अमेरिकेत त्यांचा वापर आणि ग्राहकांची संख्या यावर परिणाम होईल. ट्रम्प यांनी अनेकदा टॅरिफ मुद्द्यावरून भारतावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीतही त्यांनी हा मुद्दा उचलला होता. भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन निर्यात करतो. अमेरिकेला बासमती तांदूळ, साखर, कापूस, मसाला, चहापत्ती यासारखी उत्पादने भारताकडून पाठवली जातात.

भारतीय अन्नधान्याचे अमेरिकेत दर वाढणार
जर अमेरिकेने यावर टॅरिफ वाढवला तर भारतातून आलेला बासमती तांदूळ, मसाला, चहा यांच्या किंमती अमेरिकेत वाढतील. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकन व्यापारी हा माल भारताकडून मागवणे कमी करतील किंवा बंदही करतील. भारताच्या कृषी उत्पादनासाठी अमेरिका मोठी बाजारपेठ आहे. २०२३-२४ या काळात अमेरिकेला भारताकडून ५.१९ बिलियन डॉलर कृषी निर्यात केले. एप्रिल-जुलै २०२४ या काळात अमेरिकेला ९०,५६८ टन बासमती तांदूळ पाठवण्यात आले. अमेरिका बासमती तांदळाचा भारताचा चौथा मोठा ग्राहक आहे. भारतानेही अमेरिकेतून येणा-या कृषी उत्पादनावर टॅरिफ लावले तर सुका मेवा, फळ या गोष्टी महागतील. टॅरिफ व्यापारी संरक्षणाचं एकतर्फी शस्त्र नाही, त्यामुळे अमेरिकेलाही महागाईचा सामना करावा लागेल.

अमेरिकेने रोखली युक्रेनची मदत
झेलेन्स्की यांच्यासोबत वादानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला मिळणारी अमेरिकन सैन्य मदत थांबवली. आता अमेरिकेशिवाय युक्रेन रशियाविरोधात कितपत टिकेल हे पाहावे लागेल. युरोपने युक्रेनला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. परंतु ट्रम्प यांच्या निर्णयामुळे एनर्जी आणि फूड सप्लाई चेनवर परिणाम होऊ शकतो. युद्धामुळे आधीच युरोपात खाद्य किंमती वाढल्या आहेत. रशिया-युक्रेनच्या दीर्घ काळ चाललेल्या युद्धात भारताने शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. ट्रम्प यांनी युक्रेनची मदत थांबवली तर त्याचा फायदा भारताला होईल. कारण रशियातून येणारा कच्चे तेल, ऊर्जा साहित्य भारताला मिळत राहतील. रशिया मजबूत झाल्यात भारतासाठी ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात विश्वासाचा सहकारी मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR