22.9 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeधाराशिवचॉकलेटचे आमिष दाखवून ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

चॉकलेटचे आमिष दाखवून ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

खामसवाडी : प्रतिनिधी
एका चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर ४२ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना ३ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली. सदरील आरोपी विरूद्ध पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोस्को अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपीस पोलिसांनी अटक करून ४ मार्च रोजी कळंब न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावामध्ये ४ वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून ४२ वर्षीय नराधमाने शेतामध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी सदर मुलीवर लिंबाच्या झाडाखाली ३ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्या नराधमाने बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. सदरील पीडित मुलीला त्रास होत असल्यामुळे पीडितेच्या आईने विचार केली असता घडलेला प्रकार समोर आला. पीडीतेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यामध्ये सदरील आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४७/२०२५ पोस्को अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिराढोण पोलिसांनी सदरील आरोपीस अटक करून ४ मार्च रोजी कळंब न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर पवार करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR