24.8 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeसोलापूरधनंजय मुंडे यांचा राजीनामा हे एक प्रकारचं नाटक आहे : खा. प्रणिती शिंदे

धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे एक प्रकारचं नाटक आहे : खा. प्रणिती शिंदे

सोलापूर : संतोष देशमुख खूनप्रकरणी अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे राजीनामा दिला आहे. मात्र, तो खूप उशिरा आला आहे. तो याआधीच व्हायला पाहिजे होता. राजीनामा देताना वैद्यकीय कारण दिलं आहे. पण मुंडे यांनी नैतिक जबाबदारी म्हणून तो राजीनामा द्यायला पाहिजे होता. धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलाय. पुन्हा सहा महिन्यांनंतर त्यांना मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. कारण चौकशीत काहीही निष्पन्न झालं नाही, असे सांगून त्यांना पुन्हा मंत्री केलं जाईल, अशी शक्यता सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी वर्तविली आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा खूप उशिरा आला आहे, तो याधीच झाला पाहिजे होता. संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे, त्यासंदर्भातील फोटो आता समोर आले आहेत. मी त्यांच्या घरी जाऊन आली आहे. त्यांची मुलगी, पत्नी आणि भावाचं म्हणणं ऐकून घेतलं. पण अतिशय निगरगठ्ठ हे सरकार आहे.

संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडीओ काढून दाखवला जातोय, ते ज्यांना दाखवलं जातं होतं ते नेमके कोण होते..? कोणाच्या ऑर्डरने ते करण्यात आलं..? धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे एक प्रकारचं नाटक आहे. वैद्यकीय कारण देऊन ते वास्तव मान्य करायलाही तयार नाहीत, ही हास्यास्पद गोष्ट आहे, असेही प्रणिती यांनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडे यांच्यामध्ये थोडासा ही कॉन्शीअन्स असेल तर ते म्हणतील की, मी याची जबाबदारी घेतो. कारण हे कोणी करायला लावलं, तो कोणाचा माणूस होता आणि कोणाच्या ऑर्डर्स होत्या, हे जगजाहीर आहे. त्यासोबतच मुंडे यांचं नाव आरोपी म्हणून आलं पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. खासकरून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही प्रणिती शिंदे यांनी केली.

त्या म्हणाल्या, नेमकं हे कसं झालं आणि कशामुळे झाले..? यासाठी खोलपर्यंत गेलं पाहिजे, त्यांना कोणीही पाठीशी घालू नये. नैतिक जबाबदारी म्हणून तो राजीनामा यायला पाहिजे होता. पण त्यांनी आज राजीनामा दिला. मात्र, परत 6 महिन्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. कारण हे सरकार फक्त दाखवण्यापूरत नाटक करेल. त्यानंतर चौकशीत काही निष्पन्न झाले नाही म्हणून त्यांच्याकडून स्टेटमेंट देण्यात येईल.

स्वारगेट, मस्साजोगचा विषय, सगळीकडे आपणाला हे होताना दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या काय चाललं आहे..? कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही.. ही लोकं फक्त सत्तेसाठी हपापलेली आहेत. जेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर महाराष्ट्र नेमका कुठे जातोय..? असा सवालही प्रणिती शिंदे यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR