27.8 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमुख्य बातम्याभरआंदोलनात सोन्याची बांगडी चोरण्याचा द्रमुक नेत्याचा प्रयत्न

भरआंदोलनात सोन्याची बांगडी चोरण्याचा द्रमुक नेत्याचा प्रयत्न

 

तिरुनलवेल्ली : वृत्तसंस्था
दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषेवरुन गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत आहे. आमच्यावर हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचा आरोप दक्षिणेकडील विरोधकांनी केला. त्यामुळे तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील झाली आहेत. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासह द्रविड मुन्नेत्र कळघमनेही तामिळनाडूमधील हिंदीच्या विस्ताराला प्रचंड विरोध दर्शवला आहे.

द्रमुककडून सुरु असलेल्या विरोधादरम्यान, धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. हिंदीविरोधातील एका आंदोलनादरम्यान, द्रमुकच्या एका नेत्याने आंदोलनात सामिल असलेल्या महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी काढण्याचा प्रयत्न केला.

द्रमुकचे नगरसेवक झाकीर हुसेन यांनी हिंदीविरोधात शपथ घेताना एका महिलेचा हात धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी महिलेच्या हातातील बांगड्या काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी हुसेन यांच्या शेजारी असलेल्या एका महिलेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही हुसेन महिलेच्या हातातील बांगड्या काढत होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर द्रमुकच्या नेत्याकडून उघडपणे छेडछाड केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

३० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये, द्रमुकचे झाकीर हुसेन एका महिला सहका-याच्या हातातून सोन्याची बांगडी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मध्ये उभी असलेली दुसरी महिला त्यांचा हात बाजूला करते. पण ते पुन्हा एकदा बांगडी काढण्याचा प्रयत्न करतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR