30.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रसर्वकाही राजकारण्यांच्या वरदहस्ताने सुरू

सर्वकाही राजकारण्यांच्या वरदहस्ताने सुरू

मारहाणीच्या व्हीडीओनंतर अंजली दमानिया आक्रमक

बीड : बीडमधील शिरूर परिसरात सतीश भोसले नावाच्या भाजप कार्यकर्त्याने एका व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता या प्रकरणात आक्रमक होत हा सर्व प्रकार राजकय वरहस्ताने सुरू असल्याचे दिसत आहे. असे म्हणत सरकारवर टीका केली.

दरम्यान, बीडमधील शिरूर परिसरातील एक मारहाणीचा व्हीडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हीडीओमध्ये सतीश भोसले नावाचा भाजपाचा कार्यकर्ता आणि सुरेश धस यांचा समर्थक एका व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहे. हा व्हीडीओ बघितल्यानंतर अंगावर काटा येतो. चक्क बॅटने तो एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल होणा-या व्हीडीओनंतर सतीश भोसले आणि आमदार सुरेश धस यांचे काही फोटो पुढे आले. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते.

अंजली दमानिया यांनी म्हटले की, एका व्हीडीओमध्ये हा सतीश भोसले सरकार, दहशत आणि पैसा आमचा असल्याचे म्हणतोय. सेम जे कराडचे होते ते मोठमोठ्या २५ गाड्या घेऊन जातानाचे सेम तसेच व्हीडीओ या माणसाचे (सतीश भोसले) सुद्धा आहेत. यामुळेच असे वाटते की, हे सर्वजण एका माळेचे मणी आहेत. हे सर्वकाही राजकारण्यांच्या वरदहस्ताने सुरू आहे. जर देवेंद्र फडणवीस यांना असा महाराष्ट्र नको असेल तर त्यांनी अधिवेशनात यावर बोलले पाहिजे.

पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, नाही तर मी अधिवेशनाच्या तिथे येऊन आंदोलन करेल. आजचा दिवस मी वाट बघणार आहे, उद्या मी अधिवेशनाच्या बाहेर बसणार आहे. यावेळी अंजली दमानिया या सुरेश धस आणि सतीश भोसले यांचे फोटो दाखवताना देखील दिसल्या. हे फोटो घेऊनच मी आंदोलनाला बसणार असल्याचे दमानिया यांनी म्हटले. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR