मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या शिरूरमधील एक धक्कादायक व्हीडीओ पुढे आला आहे. या व्हीडीओमध्ये आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसतोय. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. यासोबतच सतीश भोसले याचा अजून एक व्हीडीओ व्हायरल झाला. या व्हीडीओमध्ये तो गाडीमध्ये नोटांची बंडले फेकत असल्याचे दिसतेय. या व्हायरल होणा-या व्हीडीओनंतर जोरदार टीका केली जात आहे. यावर बोलताना सुरेश धस हे आता दिसले आहेत.
नुकतेच बोलताना सुरेश धस म्हणाले की, सतीश भोसले याला मी ओळखतो. तो कधी कधी माझ्याकडे येतो. पण तो पाठिमागे असे काही उद्योग करतो हे थोडीच मला माहिती आहे. शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी अगोदर हे सांगू इच्छितो की, हा व्हायरल होणारा व्हीडीओ आताचा नाही तर दीड वर्ष जुना आहे. तो बॉस समजतो म्हणून काय झाले.
मीच बॉस सांगतो त्याच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. महिलेची छेड काढल्यावरून ही घटना घडल्याची माहिती मिळाल्याचे सुरेश धस यांनी म्हटले.
सतीश भोसले याच्याविरोधात आता गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय. व्हीडीओमध्ये मारहाण करणारा सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसतेय. आता यावर स्पष्ट भूमिकाही सुरेश धस यांनी घेतली आहे.