26 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारतावर तिहेरी संकट; परेश बरूआ ठरला प्यादा! आयएसआय, बांगलादेश अन् चीनची ‘नापाक’ खेळी

भारतावर तिहेरी संकट; परेश बरूआ ठरला प्यादा! आयएसआय, बांगलादेश अन् चीनची ‘नापाक’ खेळी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात कट्टरपंथी सरकार आलं तेव्हापासून भारत आणि बांगलादेशाचे संबंध बिघडले आहेत. युनूस सरकारमधील लोक भारताविरोधात गरळ ओकत आहेत. त्याठिकाणी अल्पसंख्याक आणि विशेषत: हिंदूवरील अत्याचार वाढले आहेत. त्यात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला बांगलादेशात बोलावून त्यांनी भारताला डिवचलं आहे. या सर्व घटना भारताची डोकेदुखी वाढवण्यासोबतच सहनशीलतेची परीक्षा घेण्यासारख्या आहेत.

भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान ही जोडी आधीच कुरापती करत आहेत. त्यात आता युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशही त्यात सहभागी झाल्यानं भारतावर तिहेरी संकट उभं राहिले आहे. अलीकडेच आसामच्या विद्रोही संघटना ‘उल्फा’ (यूनाइटेड लिबरेशन फ्रँट ऑफ आसाम) चा प्रमुख परेश बरूआचा ठिकाणा बदलला आहे. पाकिस्तान, चीन, आयएसआयच्या कटात अडकून बांगलादेश बरूआला एक मोहरा म्हणून वापरत आहे.

‘उल्फा’चा नेता परेश बरूआने त्याचा ठावठिकाणा बदलला आहे. सूत्रांनुसार पहिल्यांदा तो अरुणाचल प्रदेशच्या म्यानमार बॉर्डरवरील रुईली येथे राहत होता. हा भाग चीनमध्ये येतो. अनेक वर्षापासून बरूआ त्याच ठिकाणी वास्तव्य करतो. आता चीनने त्याचा ठावठिकाणा बदलला असून त्याला युन्नान प्रांताच्या शिशुआंगबन्नाच्या स्वायत्त क्षेत्रात पाठवले आहे. त्यामागे म्यानमारमध्ये चाललेलं विद्रोही आंदोलन कारणीभूत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR