20.9 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeपरभणीके.के.एम. महाविद्यालयात खो-खो निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

के.के.एम. महाविद्यालयात खो-खो निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

मानवत : शहादा जि.नंदुरबार येथे दि.१८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणा-या कुमार/मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी परभणी जिल्हा संघाची अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धा रविवार, दि.१० डिसेंबर रोजी के.के.एम.महाविद्यालय मानवत येथे सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खेळाडू हा ३० डिसेंबर २००५ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेला असावा. स्पर्धेसाठी येताना खेळाडूंनी ओरिजनल जन्म दाखला सोबत आणावा. सदरील संघाची निवड अ‍ॅड. महेश ढोबळे, रणजीत जाधव, महेंद्र धर्मे ही निवड समिती करणार आहे. तरी स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब जामकर, प्राचार्य बी. एस. मुंडे राज्य संघटनेचे सहसचिव व परभणी जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. पवन बारहाते पाटील, डॉ. संतोष सावंत, डॉ. संतोष खडसे, केशव शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. संतोष कोकीळ, राम चौखट, कृष्णा शिंदे, कृष्णा साळवे, सागर सुडके व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR