मुंबई : राज्यात आता पोलिसांना हाताशी धरून रोज गुन्हे करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे, पोलिसांना गुन्हा होण्याच्या आधीच माहिती असते, हे मी अनेक ठिकाणी ऐकले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये कदाचित शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसते, असे जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहेत. त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पाठीमागील शुक्लकाष्ट संपेल असे वाटत होते. मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्या काळात पीकविमा घोटाळा, आणि डीपीडीसीमधील निधीत घोटाळा झाल्याचे म्हटले होते.
करुणा शर्मा यांनी कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणामुळे धनंजय मुंडें अडचणीत सापडले आहेत. तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे, असा हल्लाबोल करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
यावेळी जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार निशाण साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. येत्या काळात महाविकास आघाडीच्या बैठक होत आहे. या बैठकीत अधिवेशनात येत्या काळात कुठल्या रणनीतीचा वापर करायचे हे ठरेल, असेही यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची छुप्पी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सभागृहात माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, राजीनामा देऊन पाच दिवस झाले त्यांनी अजूनही त्यावर बोलले नाहीत. त्यामुळे हा राजीनामा झाला असे आम्ही मानत नाही. येत्या काळात जर या प्रकरणात पोलिसांना धागेदोरे सापडले तर ते धनंजय मुंडे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करू शकतात. मला माहित नाही की पोलिसांजवळ काय माहिती आहे असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.